गौतम अदानी यांच्या मालमत्तेत वेगाने वाढ; मुकेश अंबानी, मस्क, बेझॉस यांनाही टाकले मागे

नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळामध्ये जगातील अनेक लोकांची संपत्ती वेगाने वाढली आहे. त्यामध्ये टेस्लाचे ऍलन मस्क, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी व ऍमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र भारतातील गौतम अंबानी यांच्या संपत्तीत या सर्वापेक्षा वेगाने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Why Gautam Adani is betting USD 10 billion on Australian coal

लॉक डाउनपूर्वी अदानी यांच्या संपत्तीचे मूल्यांकन 16.2 अब्ज डॉलर होते. ते आता 50 अब्ज डॉलरवर गेले आहे. म्हणजे एक वर्षात त्यांच्या संपत्तीत 34 अब्ज डॉलरनी वाढ झाली आहे.

Why and how the market bets on Gautam Adani- Business News

या कालावधीत मुकेश अंबानी यांची संपत्ती केवळ 8.1 अब्ज डॉलरनी वाढली आहे. गौतम अदानी यांच्या बहुतांश कंपन्यांचे शेअर 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. काही कंपन्यांच्या शेअरचे भाव 90 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

Spark of Corporate: Gautam Adani

अदानी एंटरप्राइजेस या कंपनीचे शेअर 90 टक्‍क्‍यांनी वाढले. अदानी गॅसचा शेअर 96 टक्‍क्‍यांनी, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 79 टक्‍क्‍यांनी, अदानी पोर्टचा शेअर 52 टक्‍क्‍यांनी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 12 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

Mukesh Ambani Remains Forbes' Richest Indian, Gautam Adani Jumps Eight  Spots To No. 2 - News Nation English

Leave a Comment