‘उद्धव ठाकरेंची मशाल पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारी वाजणार नाही’; भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका

Girish Mahajan On Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले.

यावेळी शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, यावर आता भाजपकडून टोला लगावण्यात आला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीची नावाबाबत बोलताना ती तुतारी प्राण पणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी. हाच त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपावर गिरीश महाजन म्हणतात…. । Girish Mahajan On Sharad Pawar 

सहा मंत्र्यांना खासदारकीच्या उमेदवारीवरून बोलताना गिरीश महाजन यांनी आमच्या वरीष्ठ स्तरावरील नेते हा निर्णय घेतील. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांच्यात चर्चा झाली असेल ती अजून बाहेर आली नाही ती केवळ अफवा आहे. लोकसभेच्या उमेदवारी ही केंद्रीय पातळीवरून उमेदवारीची घोषणा होते, असं महाजन म्हणाले.