गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला टोला,’35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला’

Lok Sabha Election 2024 । शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. एकनाथ खडसे यांनीही आपण भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन
’35 वर्षे आमदारकी भोगली, 20 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरले. एकदा निवडणुकीत हरले की लगेच पक्ष बदलला, ही निष्ठा आहे का? त्यामुळे पक्ष आहे म्हणून आपण आहोत, असं महाजन म्हणाले.तसेच ‘माझ्यामुळे पक्ष आहे, अशा अविर्भावात फिरणारे आता कुठे गेले? असा सवाल देखील गिरीश महाजनांनी या वेळी उपस्थित केला. ते जळगावात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘मी म्हणणारे होते त्यांचे काय झालं तुम्ही सर्वांनी बघितले आहे.  35 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष  आहे म्हणून पक्ष अशा अविर्भावात फिरणारे लोक आता कुठे झाले? एकदा पक्षातून पडले तर पक्ष बदलले. ही काय निष्ठा…त्यामुळे पक्ष आहे म्हणून आपण आहोत.  एकदा की काय तुम्ही निवडणुकीत हरले की लगेच पक्ष बदलला.’ असं म्हणत महाजन यांनी टोला लगावले आहे.

हे वाचले का ? “भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना संपवणं” ; मविआच्या ‘या’ माजी मंत्र्यांचा आरोप