अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी देणे पालकांना पडले महागात; पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलाला दुचाकी चाविण्यासाठी देणे हे पालकांना चांगलेच महागात पडले आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्या बद्दल मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. धूलिवंदनच्या दिवशी अनेक ठिकाणी मद्यपान करून अनेकजण वाहने चालवत असतात.

अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सूचना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड कॉलेज येथील तुकानी नगर सर्कल येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालवतांना मिळून आली.

यावेळी त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसल्याचे समजले. याप्रकरणी दोन्ही अलपवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना दुचाकी चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ च्या कमल ३,५, १९९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी दिली.

काय कारवाई झाली –
१) अल्पवयीन चालवीत असणारे वाहन जप्त झाले.
२) या अल्पवयीन मुलांना २५ व्या वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करू नयेयासाठी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.
३) जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा परवाना १ वर्षांसाठी रद्द करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आहे.