गौरवास्पद! 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान

महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश, तर जम्मू-काश्‍मिरातील 204 जवान

नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्‍मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109, जम्मू आणि काश्‍मीर पोलीस दलाच्या 108, सीमा सुरक्षा दलाच्या 19, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42, छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत.

महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्‍वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्‍वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.

38 तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधार सेवापदक घोषित
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी 38 तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधार सेवापदक प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. संजीत रघुनाथ कदम, सुभेदार, अमृत तुकाराम पाटील, हवालदार, महेश हनुमंत हिरवे, शिपाई या महाराष्ट्रातील कर्मचार्यांना त्यांच्या विशिष्ट सेवेबद्‌द्‌ल राष्ट्रपतींची सुधार सेवा पदके घोषित केली आहेत. तर हर्षद भिकनराव अहिरराव, अधीक्षक, वर्ग 1, दत्तात्रय माधवराव उमक, तुरुंगाधिकारी, श्रेणी 2, बाळासाहेब सोपान कुंभार, सुभेदार, प्रकाश गणपत सावर्डेकर, सुभेदार आणि अशोक दगडू चव्हाण, सुभेदार यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल सुधार सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत.

रेल्वे पोलिसांना विशिष्ट सेवा पदके
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके खालील रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना जाहीर केली आहेत. पश्‍चिम रेल्वेचे प्रमुख सुरक्षा आयुक्त प्रवीणचंद्र सिन्हा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर शमसुल अर्फिन, सहायक सुरक्षा आयुक्त, उत्तर फ्रंटियर रेल्वे, राजीव सिंग सलारिया, निरीक्षक, पश्‍चिम रेल्वे, सय्यदा तहसीन, उपनिरीक्षक, दक्षिण मध्य रेल्वे, जयश्री पुरूषोत्तम पाटील, उपनिरीक्षक, मध्य रेल्वे, प्रदीप कुमार, उपनिरीक्षक, रेल्वे मंडळ, नसीर अहमद भट, उपनिरीक्षक, एन सुब्बाराव, उपनिरीक्षक, एस ई सी रेल्वे, थिरीपाल गोटेमुक्काला, पसहायक उपनिरीक्षक, दक्षिण पश्‍चिम रेल्वे, सुब्बाराव नाटकम, पसहायक उपनिरीक्षक, टीसी मौला अली, राघवेंद्र के शिरागेरी, पसहायक उपनिरीक्षक, दक्षिण पश्‍चिम रेल्वे, सुनील भागवत चौधरी, पसहायक उपनिरीक्षक, मध्य रेल्वे, कन्वरपाल यादव, मुख्य हवालदार, पश्‍चिम रेल्वे, बी विजया सारधी, मुख्य हवालदार, टीसी मौला अली, राजेंद्र सिंग, हवालदार, जेजेआर, रेल्वे पोलीस दल अकादमी, सत्पाल, हवालदार, सफाईवाला यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.