Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली – जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात गुरुवारी मोठी घट नोंदली गेली.
सोन्याचा दर 294 रुपयांनी कमी होऊन 45,401 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीच्या दरात 26 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 59,609 रुपये प्रति किलो झाला.

सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य बऱ्याच प्रमाणात वधारले होते. रुपयाचा भाव वाढल्यानंतर सोन्याची आयात स्वस्त होते. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,768 डॉलर व चांदीचा दर 22.78 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने रोख्याची खरेदी नोव्हेंबरपासून बंद करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर लगेच व्याजदरात वाढ केली जाऊ शकते असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक डॉलरकडे वळू लागली आहे.