Gold-Silver Price : सोन्याचे भाव गडगडले; तर चांदी चमकली; पहा तुमच्या शहरात सोन्याचे दर काय ?

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यन, आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपये ५८,२६० आहे. तर मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ६९,९१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६९,९१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,४०५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,२६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४०५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,२६० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४०५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,२६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४०५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,२६० रुपये आहे.