Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करताय जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. जागतीक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही शुक्रवारी सोन्याच्या दरात भरीव वाढ नोंदली. सोन्या – चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,६६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मुंबई

२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,१९१ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,३९० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे

प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१९१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३९० रुपये असेल.

नागपूर

प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१९१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३९० रुपये इतका असेल.

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१९१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३९० रुपये आहे.