Gold-Silver Price Today : सोन्याला झळाळी, चांदीलाही उजाळा; वाचा आजचा भाव

Gold-Silver Price Today : या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदी दिलासा देण्याची शक्यता फारशी दिसत नाही. सोने-चांदी पुन्हा महाग झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने उचल खाल्ली आहे. ग्राहकांना सराफा बाजारात जाताना जादा रक्कम सोबत ठेवावी लागेल. सोने-चांदी पुन्हा उच्चांकाकडे सरकले आहे. काय आहेत भाव?

आज  १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६३,५९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,०५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,७३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.

मुंबई

 २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५८,१८१ रुपये आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,४७० प्रति १० ग्रॅम आहे.


पुणे

प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१८१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४७० रुपये असेल.

नागपूर

 प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१८१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४७० रुपये इतका असेल.

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा दर ५८,१८१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,४७० रुपये आहे.