सोने-चांदीच्या दरात वाढ कायम; आजच्या नव्या किंमती जाणून घ्या

Gold-Silver Rate Today| सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. सोन्या-चांदीच्या दरात आज (3 एप्रिल) वाढ झाली आहे. सध्या बाजारात सोन्याचे दर हे 69 हजारांच्या पुढे गेले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

सध्या लग्नसोहळ्याचा हंगामा सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतात. मात्र सध्या सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका खरेदीदारांना बसत आहे. यातच काही दिवसांवर गुढीपाडवा आल्याने सोने – चांदीचे वाढते भाव पाहून ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. Gold-Silver Rate Today|

सध्या चांदी 78,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सोने 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. तसेच चांदीच्या दरातही आणखी वाढ होऊ शकते, असे बाजारातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Gold-Silver Rate Today|

मुंबई
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,525 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,300 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 63,525 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 69,300 रुपये आहे.

नागपूर
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 63,525 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 69,300 रुपये इतका आहे.

नाशिक
22 कॅरेट सोन्याचा दर 63,525 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 69,300 रुपये आहे.

हेही वाचा: 

शेअर बाजारात घसरण ; सेन्सेक्स 73,757 तर , निफ्टी 22385 वर ओपनिंग