Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 265 रुपयानी कमी होऊन 50,616 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 786 रुपयानी कमी होऊन 57,244 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,700 डॉलर तर चांदीचा दर 19.45 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. रुपयाचा दर कमी झाल्यामुळे भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले. आगामी काळात सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.