nagar | निवडणुकीच्या धामधूमीत ९३ लाख ३० हजारांचे सोने जप्त

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत ९३ हजार ५० हजार ९७ रुपयांचे किमतीचे सोने व रोख रक्कम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. निवडणुक काळात कोणत्याही व्यक्तीला ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही.

मात्र, संबंधितीत व्यक्तीकडून १ किलो ३११.२८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच ३४ हजार ७०० रुपये रोक रक्कम, तर दुसर्या व्यक्तीकडून १ लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीचे १९.७० ग्रॅम वजनाचे दागिने असे एकूण ९३ लाख ५० हजार ९७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रमेशसिंह हेरसिंह राजपुत (वय ४७, रा. बायोसा गल्ली, बेडा, बेरा, पाली, राजस्थान), नारायणलाल हेमराज गाडरी (वय -२७, रा. गाडरी मोहल्ला, धना की, भागल, ताना, चित्तौडगढ, आकोला, राजस्थान) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागदागिने व रोख रकमेबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपायुक्त आयकर विभागाकडे देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार रमेशसिंग हेरसिंग राजपुत याच्याकडे कोणतेही अधिकृत बिले नसतांना सोन्याची विविध दागिने बाळगुन ते विक्री करण्याकरीता त्याचे एका साथीदारासह नगर येथील तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौकात थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून संशयीतांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव, मनोहर शेजवळ, रवींद्र कर्डिले, शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे, संतोष खैरे, प्रशांत राठोड यांच्यापथकाने केली.