गोंदिया जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रकरणाची “एसआयटी”मार्फत होणार चौकशी

मुंबई – गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील “एसआयटी”मार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्‍या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.

तीन शेतीविषयक कायद्यांनंतर आता शेतकरी संघटनांकडून अग्निपथ योजनेविरोधात एल्गार

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर आहेत. इंदिरा गांधी विमानतळावर आगमन झाल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रविवारी नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 7 व्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाला त्यांचाच पक्षातील नेत्यांचा विरोध