Grampanchayat Election : ग्रामपंचायतीत शिंदे गटाला घवघवीत यश; एकनाथ शिंदे म्हणतात, “खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहोचलय…’

Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसत आहे.

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याने शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलय. ठाकरे गटावर मात केलीय. तर दुसरीकडे शरद पवार की अजित पवार गट कोण विजयी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आजच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,

“ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिलाय. मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने जी काम थांबवलेली, प्रकल्प रोखलेले त्याला आम्ही चालना देण्याच काम केलं.

राज्याच्या सर्वांगीण विकासाच धोरण आम्ही आखलं. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय देण्याच काम आमच्या सरकारने केलं’. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली.

तसेच ते पुढे म्हणाले, “शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलय. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिलं. आपलं प्रेम व्यक्त केलं. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे निवडून आले. म्हणून मी मनापासून राज्यातील जनतेचे आभार मानतो. असं देखील शिंदे म्हणाले आहेत.