पुणे | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे विद्यापीठात ग्रंथदिंडी, काव्य संमेलन

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ग्रंथदिंडीचे उद्धाटन प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, गुणवत्ता सुधार केंद्राचे संचालक प्रा. संजय ढोले, पाली विभाग प्रमुख प्रा. महेश देवकर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार रोडे, संस्कृत विभाग प्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी,

इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. चंद्राणी चटर्जी, मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डाॅ. प्रभाकर देसाई उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता मराठी विभाग ते मुख्य इमारतीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता मराठी विभागात काव्य संमेलन होणार आहे.