IPL 2024 (KKR vs GT Match 63) : गुजरातसमोर आज प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या कोलकात्याचे आव्हान, गिलच्या संघाला विजय आवश्यक…

IPL 2024 (KKR vs GT Match 63) : आयपीएलचा 63वा सामना आज (सोमवार,12 मे) गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. कोलकाताने आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले. त्याचवेळी, गुजरातने आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईला पराभूत करून प्लेऑफच्या आशा नक्कीच जिवंत ठेवल्या आहेत, परंतु त्यांना प्ले-आॅफमध्ये पोहचणे इतके सोपे नाही. जर गुजरातने हा सामना गमावला तर पंजाब आणि मुंबईप्रमाणे ते स्पर्धेतून बाहेर पडतील.

गुजरातने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 जिंकले आणि 7 सामने गमावले. त्याचे 10 गुण आहेत. येथे कोलकाता 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह त्याने प्लेऑफमध्येही स्थान मिळवले. गुजरातने चेन्नईविरुद्धचा शेवटचा सामना एकतर्फी जिंकला होता. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी 210 धावांच्या भागीदारीत दमदार शतके झळकावली होती.

IPL 2024 (KKR vs MI Match 60) : गोलंदाजांच्या जोरावर कोलकाताने केला मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ…

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात गुजरातच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे चेन्नईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावाच करू शकला.

IPL 2024 (RR vs CSK Match 61) : विजयासह ‘सीएसके’च्या प्लेऑफच्या आशा कायम, राजस्थानला 5 विकेट्स राखून केलं पराभूत…

आयपीएलमध्ये गुजरात आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने दोनदा तर कोलकाताने एकदा सामना जिंकला. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कोलकाता हा लीगमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ आहे, तर गुजरातची प्ले-आॅफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मागील सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो, ज्यात गेल्या सामन्यात 2 शतकी खेळी पाहायला मिळाल्या. अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत 32 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 14 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला 18 वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे. या आयपीएल हंगामात आतापर्यंत येथे 6 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 वेळा सामना जिंकण्यात यश मिळवले आहे.