GT vs SRH Toss : हैदराबादने जिंकला टॉस.. गुजरातने टीममध्ये केले दोन महत्वाचे बदल ! ‘जाणून घ्या’ प्लेईंग ईलेव्हन

GT vs SRH Toss : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार पडणार आहे. दरम्यान हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. गुजरातने या सामन्यासाठी आपल्या टीममध्ये दोन बदल केले आहेत.

गुजरात आपला शेवटचा सामना हरल्यानंतर मैदानात उतरत आहे तर हैदराबादने आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्ससमोर सध्या चांगल्या फॉर्मात असणाऱ्या सनराईझर्स हैदराबादचे मोठे आव्हान आहे. | GT vs SRH

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट. | GT vs SRH

GT vs SRH : Head To Head Records
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सच्या पदार्पणापासून, गुजरात आणि हैदराबादमध्ये आतापर्यंत फक्त 3 IPL सामने खेळले गेले आहेत. गुजरातने त्यापैकी 2 तर हैदराबादने 1 सामना जिंकला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरातची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 199 आणि गुजरात टायटन्सविरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 195 आहे. | GT vs SRH

दरम्यान, गुजरात दोन सामन्यांतून 2 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबादचेही दोन सामन्यांतून 2 गुण आहेत, मात्र जास्त नेट रनरेटमुळे ते चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, 24 मार्च रोजी झालेल्या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात GT ने मुंबई इंडियन्स विरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. 26 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. | GT vs SRH