पुणे जिल्हा | शेतकर्‍यांना कीटक रोगांवर मार्गदर्शन

नारायणगाव, (वार्ताहर) – शेतकर्‍यांना पिकांवर पडलेल्या रोगांची माहिती देऊन पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या कीटकांची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना विविध प्रकारचे शत्रू कीटक व मित्र कीटक यांची ओळख करून दिली. त्यांचे महत्त्व, होणारे फायदे व नुकसान, संरक्षण कसे करावे, कसे हाताळावे याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे नियोजन अथर्व देशमुख, अनुराग वानखडे, केशव घोगडे व तपन जैन यांनी केले होते. यासाठी मुख्याध्यापक भाग्योदय खोब्रागडे, समन्वयक डॉ. अविनाश खरे, कार्यक्रम अधिकारी डॉ.कांकल आणि अभ्यासक्रम शिक्षिका नीलम बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यांच्या शंकांचे निरसन विद्यार्थ्यांनी केले.