Hair Colour Tips : हेअर कलर करताय!

केसांना कलर करणे हा ट्रेंड वाढतोय. पांढरे केस लपवण्यासाठी ब्लॅक कलर सर्रास वापरला जातो. मात्र आजची तरुणाई ब्लॅक केसांना व्हाइट बनवताना दिसतायत.

 रेड, येलो असे हेअर कलर सध्या ट्रेन्ड आहेत. आता कलर करताना तात्पुरता की कायमचा कलर करायचा हे ठरवा. तसेच केसांना कलर केल्यानंतर काळजीही घ्यावी लागते.

 कलर करताना चांगल्या दर्जाचे कलर वापरा. त्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम दिसून येईल. हेअर कलर केल्यानंतर आपला रेग्युलर शॅम्पू वापरण्याऐवजी कलर प्रोटेक्‍टिंग शॅम्पू वापरा. हेअर कलर केल्यानंतर हिट प्रोटेक्‍टर वापरू नये. 

हेअर कलर केल्यानंतर गरम पाण्याने केस धुऊ नये. त्यामुळे केसांचा रंग फिकट होऊ शकतो. केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरावे. यामुळे केस मजबूत होतात.