Hamas commander : हमासचा लष्करी डेप्युटी कमांडर ठार

जेरुसलेम – या महिन्यात इस्रायली हल्ल्यात हमासचा उप-सैन्य कमांडर मारवान इसा मारला गेला, असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले. आम्ही सर्व गुप्त अहवाल तपासले आहेत,

असे रिअर ऍडमिरल डॅनियल हगारी यांनी टिव्हीवरील एका मुलाखतीमध्ये सांगितले. आम्ही सुमारे दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या हल्ल्यात मारवान इस्साचा खात्मा करण्यात आला, असे ते म्हणाले.

मरवान इसा मारला गेल्यामुळे हमासला मोठा धक्का बसला असून, इस्रायलने या कारवाईची पुष्टी केली आहे. दिनांक १० मार्च रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात मारवान इसा मारला आहे, असे डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मध्य गाझाच्या नुसीरतमधील बोगद्यावरील हवाई हल्ल्यात हमासचे दोन दहशतवादी मारवान इसा आणि गाझी अबू तमा मारले गेले. इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडात हमासचे हे दोन्ही वरिष्ठ कमांडर सामील होते.