मेहनत फळाला आली…! सिक्योरिटी गार्डच्या लेकाला आयपीएलने बनवले करोडपती

Success Story – दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती बनतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चमत्कार करत आहेत.

 

 

या आयपीएल लिलावातही अनेक युवा खेळाडू करोडपती झाले आहेत. समीर रिझवीपासून शुभम दुबे आणि कुमार कुशाग्रापर्यंत अनेक खेळाडू यावेळी महागात विकले गेले. दरम्यान या यादीतील एक नाव सध्या चर्चेत आहे,  झारखंडच्या रॉबिन मिंजचे नाव सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. त्याला गुजरात संघाने 3.6 कोटी रुपयांना विकत घेतले. दरम्यान, लिलावापूर्वी धोनीने त्याला वचन दिले होते की जर कोणत्याही संघाने त्याच्यावर सट्टा लावला नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघ नक्कीच त्याला खरेदी करेल.  अशात अनेक संघांनी रॉबिनला विकत घेण्यासाठी स्पर्धा केली. चेन्नईशिवाय हैदराबादनेही त्याच्यावर बोली लावली. अखेर गुजरातने त्यांचा संघात समावेश केला.

 

 

रॉबिन मिन्झ हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे, रांची विमानतळावर रॉबिन मिन्झचे वडील सुरक्षा रक्षक आहेत,लहानपणी तो बॅट बनवून क्रिकेट खेळत असे, परंतु त्याच्या कुटुंबाने त्याला खेळण्यापासून कधीच रोखले नाही. याच कारणामुळे कठीण आव्हानांवर मात करत तो इथपर्यंत पोहोचला आहे.

त्याच्या प्रशिक्षकानेही त्याला नेहमीच साथ दिली आणि आज हा खेळाडू सर्व अडचणींवर मात करून आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी बनण्यास तयार आहे. या लीगमध्ये सामील होणारा तो पहिला आदिवासी ठरला आहे.

मीडियाशी बोलतांना रॉबिन म्हणाला की,’मी अजून काहीही साध्य केलेले नाही. मला अजूनही सर्वकाही साध्य करायचे आहे.  आयपीएलच्या माध्यमातून देशासाठी खेळायचे आहे आणि भारतीय संघाकडून खेळताना विश्वचषकही जिंकायचा आहे.’

 

दरम्यान, रॉबिन हा पुढचा धोनी मानला जात आहे. मोठे फटके खेळण्यात तो माहीर आहे. त्याचा स्वभाव शांत आहे आणि तो शिकण्यास उत्सुक आहे. असे खेळाडू जागतिक स्तरावर चमत्कार करतात.