फिरत्या दवाखान्यात होणार ढेकळवाडीकरांची आरोग्य तपासणी

बारामती – तालुक्यातील ढेकळवाडी गावातील नागरिकांची दिनांक 26 रोजी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी होणार असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वतीने सरपंच सीमा झारगड व उपसरपंच शुभम ठोंबरे यांनी केले आहे.

हिराभाई बुटाला ट्रस्ट यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गद्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला आहे.

शनिवार दि.(26) रोजी सकाळी तपासणी होणार आहे. ऑक्सिजन, बी. पी.,शुगर व किरकोळ आजार, लैंगिक समस्या उपचार फिरता दवाखान्यात होणार आहेत. सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.