…तर मग म्हणा,’I Am Safe, I Am Healthy’

आजकाल सगळीकडे कशाची भीती आहे हे सांगायची गरज नाही,सकारात्मक चिंतनाचा अंतर्मनाचा एक नियम असा की तो विशिष्ट शब्द वगळून बोलणे,तो शब्द टाळणे. शब्दाला एक चित्र असतं आणि जितक्या वेळा जितक्या इंटेन्सिटीने तो उच्चारला जातो तितका अंतर्मनात जाऊन मेनिफेस्ट होण्याची शक्यता वाढते.

विशिष्ट आजाराकडे लाॅ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने कसं पहायचं किंवा अशा परिस्थितीत मनाचं संतुलन कसं ठेवायचं यासाठी काही उपाय.

1) आवश्यक माहिती एकदा घेतली की ते पुरेसं आहे चर्चा करण्याची विषय चघळत बसण्याची गरज नाही. जागृती ठेवत आपण उगाच पॅनिक होतोय का?उपायांवर न बोलता भीती निर्माण करतोय का? याचा विचार करा.

2)आवश्यक काळजी घेण्याच्या दृष्टीने ट्रिगर्स सेट करा. आठवण देतील असे रिमायंन्डर्स लावा .उदा एक वेळ ठरवून पाच ते दहा मिनिटं उन्हात बसणे.

3)कोणीही अफवा पसरवत असेल, ईकडून तिकडून ऐकलेलं बोलत असेल तर आधी निश्चित पुरावा आहे का ? विचारा.

4) सकारात्मक सूचना लिहून ठेवा आणि दिवसभरात चिंता काळजी वाटली की पुढील सूचना वारंवार म्हणा. I Am Safe, I Am Healthy

5)दररोज आरोग्यासाठी धन्यवाद म्हणा,आजचा दिवस सुरक्षित गेला यासाठी रात्री झोपताना थँक्यू म्हणा आणि सकाळी उठल्यावर पुन्हा धन्यवाद म्हणा.

6)निसर्ग पहा,सूर्य,आकाश,माती,झाडं,फुलं यांना पाहून जगणं समजून घ्या, आजपर्यंत जगण्याचे अनेक अनुभव आपण घेतले त्यापैकी एक म्हणून वर्तमानाकडे पहा.

Leave a Comment