बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले, सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे जवान तेज बहादुर यादव यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर तेज बहादुर यादव यांच्या या याचिकेवर उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यादव हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना त्यांनी तेथील जवानांना मिळणाऱ्या निकृष्ठ भोजनाविषयीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता.त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेज बहादुर यादव यांना समाजवादी पक्षाने अधिकृत उमेदवारही घोषित केले होते. निवडणूक अर्जासोबत त्यांनी एक अपेक्षित सर्टिफिकेट सादर न केल्याने त्यांचा अर्जच बाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Leave a Comment