हृदयद्रावक! तेलंगणामध्ये कबड्डी सामन्यादरम्यान स्टेडियमची गॅलरी कोसळली; दुर्घटनेत 100 हून जास्त लोक जखमी

हैदराबाद : तेलंगाणाच्या सूर्यापेटमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 47वा राष्ट्रीय ज्युनियर कब्बडी स्पर्धेच्या प्रारंभाच्या सोहळ्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यातच अचानक एक गॅलरी तुटून खाली कोसळली. गॅलरीतून जवळपास 1500 लोक खाली पडले. या दुर्घटनेत 100 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुर्घटनेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढिल उपचारासाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार आहे.

दुर्घटनेबाबत माहिती देताना सूर्यापेटचे एसपीनी माहिती दिली. अद्याप दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात कमकुवत लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल्या संरचनेमुळे झाला हे. दरम्यान, दुर्घटनेचं खरं कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होईल.

स्थानिक माध्यमांनी दाखवलेल्या व्हिज्युअल्समध्ये गॅलरी कोसळल्यामुळे लोक खाली पडताना दिसून येत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलरी कोसळल्यानंतर गर्दी खाली कोसळली आणि लोक खाली पडले. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर लगेचच अॅम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांमधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Leave a Comment