संगणकाचा हात असणाऱ्या ‘माउस’बद्दल या खास गोष्टी…जाणून घ्या त्याचे नाव कसे पडले?

नवी दिल्ली : बाहेरच्या जगात कुठेतरी वस्तू उचलण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी हाताचा वापर केला जातो. त्याच वेळी, संगणकावर समान कार्य करण्यासाठी आपल्याला माउसची आवश्यकता असते. स्क्रीनवर फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा आयकॉनवर क्लिक करण्यासाठी आपण माऊसची मदत घेतो, परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की संगणकाच्या महत्त्वाच्या उपकरणाचे नाव ‘माउस’ का ठेवले गेले? चला आज जाणून घेऊया संगणकाच्या या महत्त्वाच्या उपकरणाविषयी काही रंजक तथ्ये…

* माउसचा शोध कधी लागला?
माउसचा शोध केव्हा आणि कोणी लावला हे सर्वप्रथम जाणून घेऊया. माऊसचा शोध डग्लस कार्ल एंजेलबर्ट यांनी 1960 मध्ये लावला होता. माऊसचा शोध लागला तेव्हा त्याला ‘पॉइंटर डिव्हाईस’ असे नाव देण्यात आले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डग्लस कार्ल एंजेलबर्टने लाकडापासून जगातील पहिला माउस बनवला. तसेच त्यात धातूची दोन चाके होती.

* माऊस असे नाव कसे दिले?
जेव्हा माउसचा शोध लागला, तेव्हा त्याला नाव देण्याबाबत चर्चा झाली. पण याच्या डिझायनिंगवरून हे एक छोटेसे उपकरण एखादा उंदीर लपून बसल्यासारखेच दिसते. तसेच त्याच्या मागून येणारी तार ही उंदराच्या शेपटीसारखी दिसते. इतकंच नाही तर उंदीर जशी सगळी कामं पटकन करतो, त्याच पद्धतीने माऊस सगळी कामं पटकन करत असे. हे सर्व पाहिल्यानंतर या उपकरणाचे नाव माउस ठेवण्यात आले.

* आणखी एक मनोरंजक तथ्य
माऊसबद्दल तुम्हाला आणखी एक खास गोष्ट काय माहीत आहे? जर नसेल, तर आम्ही सांगतो, त्याला ‘माउस’ आणि ‘पॉइंटर डिव्हाइस’ व्यतिरिक्त ‘टर्टल’ असे नाव देण्यात आले आहे. कारण या संगणकीय उपकरणाचे कवचही कासवासारखे कठीण असून आकारही सारखाच आहे, परंतु कासवाचा वेग खूपच कमी असल्याने त्याचे माऊस नाव कायम ठेवण्यात आले होते.

काळाच्या ओघात तंत्रज्ञानातही बरेच बदल झाले आहेत. प्रत्येक जुन्या गोष्टीत काही ना काही बदल झाले आहेत, त्यामुळे आपले काम पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आता वायरलेस माऊस बाजारात आले आहेत, जे लॅपटॉप किंवा संगणकाशी ब्लूटूथद्वारे कनेक्ट होतात