डॉमिनिक नाव ठेवल्याने पालकांचा मोठा लाभ

सिडनी – ऑस्ट्रेलियातील क्‍लेमेंटायन ओल्डफिल्ड आणि अँटनी या दाम्पत्याला एक मोठा लाभ झाला आहे. त्यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव डॉमिनिक असे ठेवल्याने त्यांना तब्बल साठ वर्षे दररोज पुरवठा होईल अशा पिझ्झा मूल्याचे बक्षिस मिळाले आहे.

पिझ्झा उद्योगात आघाडीवर असलेल्या डॉमिनोज ऑस्ट्रेलिया या कंपनीने आयोजित केलेल्या एका योजनेमुळे या पालकांना हा लाभ झाला आहे. डॉमिनोज ऑस्ट्रेलिया या कंपनीला नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली असून 9 डिसेंबर रोजी जन्म घेणाऱ्या मुलाचे नाव जर पालकांनी डॉमनिक ठेवले तर त्यांना बक्षिसे देण्याची घोषणा कंपनीने केली होती.

या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव डॉमिनिक ठेवल्याने कंपनीने त्यांना 10800 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे सहा लक्ष रुपये बक्षीस दिले. तब्बल 60 वर्षे जर दररोज पिझ्झा खाल्ला तर त्याची जी किंमत होईल ती लक्षात घेऊन कंपनीने ही बक्षिसाची रक्कम ठरवली होती.

या दाम्पत्याने आधीच आपल्या मुलाचे नाव डॉमिनिक ठेवले होते स्पर्धेचा कालावधी सुरु झाल्यानंतर दोनच तासात मुलाचा जन्म झाला आणि या दाम्पत्याने स्पर्धा जिंकली. खरे तर या दाम्पत्याला प्रारंभी या स्पर्धेची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांच्या मित्राने त्यांना ती माहिती दिली. डॉमिनोज ऑस्ट्रेलिया या कंपनीने सोशल माध्यमावर जाहीर करून क्‍लेमेंटायन ओल्डफिल्ड आणि अँटनी या दाम्पत्याने हो स्पर्धा जिंकल्याची घोषणा केली

Leave a Comment