अहो सांगता काय?! उत्खननात सापडलेला नाण्यांनी भरलेला कलश घेऊन जेसीबी चालकाचा पोबारा

कन्नौज :  एखाद्या ठिकाणी उत्खनन सुरु असताना जर एखादी पुरातन वस्तू आढळून अली  तर कायद्याने या पुरातन काळातील वस्तू सापडल्यानंतर त्या वस्तू ह्या सरकारच्या  पुरातत्व विभागाकडे सोपविल्या जातात. मात्र या उत्तर प्रदेशात एक अजबच घटना घडली आहे.  उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी सिकंदरपूर परिसरातील रायपूर भागात असलेल्या टेकडीचे उत्खनन चालू होते. या उत्खननात नाण्यांनी भरलेला कलश बाहेर आला.  दरम्यान,  जेसीबी चालकानेच मिळालेला नाण्यांनी भरलेला कलश घेऊन पोबारा केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जीटी रोडच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान रायपूर गावात ढिगाऱ्याचे उत्खनन केले जात होते.  गावकऱ्यांना ढिगाऱ्याजवळ काही नाणी सापडली. या नाण्यांची जात जुन्या काळातील विशिष्ट धातू म्हणुन ओळखली आहे.  गावकऱ्यांनी सांगितले की, ढिगाऱ्यावरील मातीचा कलश पुरातत्व काळातील ॲल्युमिनियमच्या नाण्यांनी भरलेला होता. मात्र जेसीबी चालकाला ते नाणे सोने -चांदीचे असल्याचे वाटले  आणि त्यामुळे त्याने तो कलश घेऊन पळून गेला. गावकऱ्यांना घटनास्थळी काही नाणी सापडली. त्यांनी ती नाणी उचलली.

गावकरी नाण्यातील धातू ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गावकऱ्यांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणाची माहिती भारतीय पुरातत्व विभागाला दिली आहे.आता पोलीस जेसीबी चालकाचा शोध घेत आहेत.

सोमवारी कन्नौज जिल्ह्यातील सिकंदरपूरच्या रायपूर गावातील ढिगाऱ्याच्या उत्खनना दरम्यान, अनेक लोक नाणी सापडल्याच्या माहितीवर पोहोचले. ते सभोवतालच्या रुंदीकरणासाठी जीटी रोडच्या बाजूला ठेवलेली माती काढून नाणी शोधत राहिले. संध्याकाळी उशिरा पर्यंत हा ढिगारा नैसर्गिक धातूंनी भरलेला असल्याचे गावकरी सांगतात.