समलिंगी विवाह : हायकोर्टाने मागवले केंद्राचे मत

नवी दिल्ली – समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी अशा स्वरूपाचा विवाह करणाऱ्या दोन जोड्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे, यापैकी एका जोडप्याने स्पेशल मॅरेज ऍक्‍ट खाली तर दुसऱ्या जोडप्याने विदेशी मॅरेज ऍक्‍ट खाली ही अनुमती मागितली आहे.

या विषयी केंद्र सरकारने आणि दिल्ली सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना करणारी नोटीस हायकोर्टाने जारी केली आहे.

यातील एक जोडपे अमेरिकेत विवाहबद्ध झाले असल्याने कोर्टाने या प्रकरणात न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासालाही नोटीस जारी केली आहे. असा विवाह अमेरिकेत करणारे हे दोन पुरुष आहेत. त्यांच्या तेथील विवाहाला अनुमती का दिली गेली नाही अशी विचारणा हायकोर्टाने भारतीय वकिलातीकडे केली आहे.

या दोन्ही याचिकांवरील पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. या दोन्ही याचिकांमध्ये जी मते मांडण्यात आली आहेत त्याविषयी आमच्या मनात शंका नाहीत; पण सध्या जे विवाहविषयक कायदे प्रचलीत आहेत त्यात समलिंग विवाहांना कायदेशीर ठरवण्यात अडचण आहे असा अभिप्रायही कोर्टाने यावेळी नोंदवला.

स्पेशल मॅरेज ऍक्‍ट किंवा फॉरेन मॅरेज ऍक्‍ट नुसार विवाहाची व्याख्या करता येत नाही. प्रत्येक जण विवाह विषयक प्रचलीत कायद्यानुसारच विवाहांचा अर्थ लावत असतो असे कोर्टाने म्हटले आहे.

Leave a Comment