अबब..! ‘या’ व्यक्तीने तब्बल 34128 बर्गर खाण्याचा केला ‘विक्रम’ तर एका वर्षात 700 बर्गर खाण्याची ‘नोंद’

वॉशिंग्टन –  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सहसा ज्या विक्रमांची नोंद करते त्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीतले विक्रम अधिक असतात आयुष्यात सर्वात जास्त बर्गर खाण्याचा विक्रम केलेल्या एका व्यक्तीने 2023 या एका वर्षामध्ये 700 बर्गर खाऊन या विक्रमाला अधिकच व्यापक केले आहे.

या व्यक्तीने आयुष्यभरात खाल्लेल्या बर्गरची एकूण संख्या 34,128 झाली आहे विस्कॉन्सिंस प्रदेशात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव डोनाल्ड गोरस्के असे असून तो 70 वर्षाचा आहे मॅकडोनाल्ड्स या प्रख्यात फास्ट फूड स्टोअरमधील बिग मॅक हे गाजलेले बर्गर सातत्याने खाण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.

गोरस्केने 1972 मध्ये प्रथम मॅक्डोनाल्डचा बर्गर खाण्यास सुरुवात केली 50 पेक्षा जास्त वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने खाल्लेल्या प्रत्येक बर्गरची पावती त्याने जपून ठेवली असून त्या आधारेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या विक्रमाची दखल घेतली आहे 1999 मध्येच त्याच्या नावावर सर्वात जास्त बर्गर खाणारा व्यक्ती हा विक्रम नोंदवण्यात आला होता.

अद्याप कोणीही हा विक्रम मोडलेला नाही उलट यावर्षी आपण किती बर्गर खाल्ले याची नोंद तो करत असल्याने त्याच्या विक्रमाची व्याप्ती वाढतच चालली आहे 2023 मध्ये त्याने वर्षभरात सातशे बर्गर खाल्ल्यामुळे तआतापर्यंत खाल्लेले ऐकून बर्गरची संख्या 34,128 झाली आहे गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्याने बर्गर खात असलो तरी मला कोणतीही आरोग्य विषयक समस्या नाही अशी माहितीही त्याने दिली आहे मला बर्गर खायला आवडतो म्हणूनच मी तो खातो इतर अनेक फास्ट फूड आयटम खाण्याचा प्रयत्न मी केला पण मला ते आवडले नाहीत सर्वात जास्त बर्गर खाणारा माणूस हे रेकॉर्ड 24 वर्षे त्याच्या नावावर आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या नावावर सर्वाधिक काळ गिनीज बुक रेकॉर्ड असण्याची ही पहिलीच वेळ आहे.