द्राक्ष बागायतदारांना फटका

निवृत्तीनगर (संजय थोरवे) – सांगली, नाशिकनंतर जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा ऐन हंगामत करोनाचे संकट ओढावल्याने द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

तालुक्यातील द्राक्षे निर्यातक्षम असल्याने चांगला दर मिळत असतो. यासाठी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेताना खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. काही दिवसांपूर्वी युरोपीय देशांनी बंदी घातली असताना अनेकांनी बागा काढून टाकणे पसंत केले होते. यानंतर सर्व काही सुरळीत चालेल असे चित्र असताना आता करोमुळे द्राक्षउत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे.

द्राक्षबागेसाठी एका एकरावर पाच ते सहा लाख रुपये खर्च होतो. हा खर्चही यंदा वसूल होणे अवघड बनले आहे. खर्चाची तोंडमिळवणी तरी व्हावी, या आशेने काहींनी बेदाणे उत्पादन करायचे ठरवले आहे.

Leave a Comment