होमिओपॅथी एक शास्त्रोक्त उपचार पद्धती

पुणे – होमिओपॅथी (Homeopathy) ही उपचार पद्धती आता भारतासह जगभर लोकमान्य आणि राजमान्यही झालेली आहे. या उपचार पद्धतीची बलस्थाने आणि मर्यादा याविषयी अनेकदा चर्चा होत असते. आयुर्वेद, ऍलोपॅथी, निसर्गोपचार किंवा युनानी वैद्यक अशा उपचार पद्धतींमध्ये होनिओपॅथी(Homeopathy)ने आपला एक ठसा उमटवला आहेच. मात्र, अनेक रुग्णांच्या अनुभवावरुन असे नक्की सांगता येते की, ही उपचारपद्धती निर्धोक आहे. या उपचारपद्धतीच्या बलस्थानांचा घेतलेला वेध…

आधुनिक वैधक पद्धतींची सुसज्ज भव्य रुग्णालये विविध तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचारी, प्रचंड मोठ्या औषध कंपन्यांतून तयार केलेली आकर्षक किमती औषधे सुसज्ज प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे व रोगनिदानाच्या अद्ययावत प्रगत महाग चाचण्या राजाश्रय व वैद्यकीय क्षेत्राचे नियंत्रणाचे अधिकार यामुळे आधुनिक वैद्यक शास्त्राबद्दल (ऍलोपॅथी) जनसामान्यांना प्रचंड आकर्षण व आणीबाणीच्या गंभीर रोगावस्थावर तातडीने प्राण वाचविण्याच्या इलाजाच्या कुवतीमुळे या शास्त्राबद्दल आदर वाटणे स्वाभाविक आहे.

याउलट होमिओपॅथी(Homeopathy) पद्धतीत औषधे साबुदाण्यासारखी साध्या गोड गोळ्या किंवा पावडर स्वरूपात असतात. होमिओपॅथी(Homeopathy)ची खास रुग्णालये शासकीय अथवा खासगीही नाहीत. देशी परदेशी फारशा पदव्या असणारे विविध अवयव तज्ज्ञ होमिओपॅथी(Homeopathy)त नाहीत ज्या शास्त्राचा प्रसार व प्रचारही फारसा नाही अशा शास्त्राने गंभीर रोग कसे काय बरे होणार, ही साशंकता असते. त्याचबरोबर सर्व उपचार घेऊन थकलेले जुनाट रोगी रोगमुक्‍त होमिओपॅथी(Homeopathy)ने कसे काय बरे होऊ शकतात याचे कुतुहल जनसामन्यांना तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जाणत्यांनाही असते.

होमिओपॅथी(Homeopathy)चे जनक आहेत जर्मनीचे डॉ. सॅम्युअल हनिमन. तत्कालीन अलोपॅथी उपचाराने रोग बरे होऊ शकत नव्हते. उपचार क्‍लेशकारक होते, रोगनिर्मूलनाचे निश्‍चित तत्त्व नव्हते. म्हणून अलोपॅथीतील एम. डी. पदवी व उत्तम व्यवसाय असतानाही व्यवसाय त्यांनी बंद केला. नवीन काही सांगण्याच्या वाट्याला येणाऱ्या, हालअपेष्टा मानहानी डॉ. हनिमन यांनाही सोसावे लागले. होमिपॅथी(Homeopathy)च्या क्रांतिकारक शोधासाठी देश त्यागही करावा लागला, पण डॉ. हनिमन यांनी शोधलेली होमिओपॅथी आज अखिल मानव जातीला वरदान ठरली आहे! सध्या जगात अनेक उपचार पद्धती आहेत. त्यातून होमिओपॅथी(Homeopathy)चे वेगळेपण काम आहे हे समजून घेणेही कुतुहलाचे आहे. 

1) सजीव शरीरात दोन समधर्मी शक्‍ती असतात. त्या जरी भिन्न प्रकारच्या असल्या तरी प्रबल शक्‍ती दुर्बल समधर्मी शक्‍तीस कायमची नष्ट करते ह्या निसर्गाच्या शाश्‍वत सिद्धांतावर होमिओपॅथी(Homeopathy)ची उभारणी असल्याने ती शाश्‍वत, चिरंजीव, अमर आहे.

2) शरीरास सजीवतेला आवश्‍यक असणाऱ्या चैतन्य शक्‍तीची सुदृढावस्था म्हणजे “आरोग्य’ त्यातील बिघाड म्हणजे “रोग’ हा बिघाड दुरुस्त करणे म्हणजेच “रोगनिर्मूलन, चैतन्य शक्‍ती नष्ट होणे म्हणजे मृत्यू. चैतन्य शक्‍ती ही अदृश्‍य स्वरूपात असते. त्यातील बिघाड हा शरीर मनाद्वारे लक्षण चिन्हाद्वारे प्रगट होतो. लक्षण समुच्चय म्हणजेच रोगाचे प्रतिबिंब, लक्षण समुच्चय समधर्मी औषधाने नष्ट करण्याने रोग मुक्‍ती होते. हे होमिओपॅथी(Homeopathy)चे दुसरे तत्त्व आहे.

3) चैतन्य शक्‍ती अशी अदृश्‍य असते तशाच स्वरूपात औषधांची शक्‍ती विशिष्ट पद्धतीने प्रभावित केली जाते व शक्‍तीकृत औषधाच्या सूक्ष्म मात्रांचा. चैतन्य शक्‍तीवर परिणाम होऊन तिला रोगशक्‍तीपासून मुक्‍त केली जाते. हे होमिओपॅथी(Homeopathy)चे तिसरे तत्व आहे. याशिवाय-

4) शक्‍तीकृत औषधाचे गुणधर्म निरोगी व्यक्‍तीवर प्रयोग करून, सिद्धीकरण करून तपासले जातात. अशा सिद्ध औषधांच्या गुणधर्माच्या माहितीची ग्रंथ म्हणजेच “मटेरिया मेडिका’ होय.

5) औषधांचे सिद्धीकरण अमिश्रित स्वतंत्र केलेले असते म्हणून रोग लक्षणाशी साम्य असणारे एका वेळी एकच अमिश्रित औषधाची मात्रा देणे शास्त्रशुद्ध असते.

6) ज्या औषधाची क्रिया सुरू होण्यास लागणाऱ्या कमीतकमी मात्रेचा वापर पुरेसा असतो.

7) रोग निर्मूलनात, डूहिूश्रळी, डलूलीेळी हे त्रिदोष कारणीभूत असतात. हे अनेक वर्षाच्या संशोधनातून डॉ. हनिमननी शोधले. हे त्रिदोष दोषनाशक समधर्मी औषधाने घालवल्यास रोग निर्मूलन समूळ होते आदी तत्त्वांचा शोधही डॉ. हनिमननीच लावला.

ह्या उपचारांचे आणखी वैशिष्ट म्हणजे एकाच रोगाने पीडित असणाऱ्या प्रत्येकाचे भिन्न औषध असू शकते. कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया वैशिष्ट्यपूर्ण असते. तसेच एकच औषध अनेक रोगात लक्षणानुसार उपयुक्‍त असते.

ह्या उपचारात रोगाची मूळ प्रक्रिया थांबवली जाते. रोगप्रक्रियेमुळे निर्माण झालेली लक्षणे चिन्हे, विकृती म्हणजे रोग नसून ते रोगाचे परिणाम असतात. त्यामुळे परिणामावर उपचार न करता मूळ रोग प्रक्रियेवर उपचार केल्याने रोग समूळ नष्ट होतो. अल्सर, ट्युमर, वर शस्त्रक्रिया करणे म्हणजे रोगाच्या परिणामावर उपचार होय. तसेच अम्लपित्ताला ऍन्टासीड औषधांचा वापर करण्याने तात्पुरता आराम मिळतो पण मूळ प्रक्रिया कायमच असते.

होमिओपॅथी(Homeopathy) उपचारांची व्याप्ती व उपयुक्‍ताता – अर्भके, बाल, तरुण, वृद्ध स्त्री पुरुष यांच्या सर्वच रोगात होमिओपॅथी(Homeopathy) उपयुक्‍त आहे. होमिओपॅथी(Homeopathy)ने बरे होऊ शकणारे सर्व रोग बरे होतात पण जे रोग असाध्य असतात त्यात औषधांचा विषारी रोग निर्माण न करता रुग्णात जास्तीतजास्त बिनधोक आराम होमिओपॅथी(Homeopathy)ने देता येतो.

काही रोगात शस्त्रक्रियेची आवश्‍यकता आहे असे सांगितले जाते. असे रोग विनाशस्त्रक्रिया होमिओपॅथी(Homeopathy)ने बरे होऊ शकतात. ज्या रोगास शस्त्रक्रिया अटळ आहे, अशा रुग्णांनाही शस्त्रक्रियेआधी मधे व नंतर होमिओपॅथी(Homeopathy) उपयुक्‍त असते.

होमिओपॅथी(Homeopathy)ने शस्त्रक्रियेविना शरीरात नाक, स्तन, गर्भाशयातील गाठी, ट्युमर सीस्ट, गॅंगलीऑन, हाडांची वाढ, स्पर, अल्सर, भगंदर मूळव्याध, मुतखडे, पित्तखडे आदी रोग बरे होतात. स्थूलपणा, त्वचाविकार, केसांचे विकार आधी घालवून सौंदर्य संवर्धनासाठी होमिओपॅथी(Homeopathy)त यशस्वी उपचार आहेत.

सुमारे 75 टक्‍के रोग हे मनोकायीक असतात. मनाच्या लक्षणांना होमिओपॅथीत महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे मनोकायीक व मानसिक रोगात होमिओपॅथीत असामान्य उपचार आहेत. इथे रुग्णोपचारातील स्नानुभव दिल्यास ते प्रस्तुत ठरू नयेत.

1) मेंदूतील ट्युमरमुळे अंध व शेवटी 15 दिवस बेशुद्धावस्थेतील रुग्णासा मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईस नेणेचा सल्ला मोठ्या रुग्णालयात दिला. तज्ज्ञांच्या मते हा अत्यवस्थ रुग्ण पाच दिवसही जगू शकणारा नव्हता. असा रुग्ण होमिओ उपचाराने शुद्धीवर येऊन जगला.

2) दुसरा एक बेशुद्धावस्थेतील रुग्ण पुण्यातील मोठ्या रुग्णालयात पाहाण्यास मला बोलावले सदर रुग्णावर सर्व उपचारांचा उपयोग करून शेवटी उपचार बंद केले होते. शहरातील नामवंत तज्ज्ञांनीही रोगी पुन्हा जागृत होणार नाही त्याचा अंत अटळ आहे, असे सांगितल्याने रुग्णाचे मरणोत्तर देहदानाचे कायदेशीर सोपस्कारही झाले होते. अत्यवस्थ रोगी कोणत्याही क्षणी जाणार अशी खात्री होती. असा रुग्ण होमिओ उपचारांनी शुद्धीवर आला आणि जगला.

3) अन्ननलिकेचा कर्क रोग असे निदान करून शस्त्रक्रियेची तयारी केलेल्या रुग्णाने शस्त्रक्रिया नाकारून होमिओ उपचार माझ्याकडे घेतले. दोन महिन्यापासून खातापिता न येणारा रुग्ण तीन महिन्यांत पूर्ण रोगमुक्‍त झाला याची खात्री पणे व कोल्हापुरातील शस्त्रक्रिया सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांनीच केली.
4) पायाला झालेल्या अल्सरला अनेक वर्षे उपचार घेऊन फायदा न होता पाय कापण्याचा सल्ला दिलेले दोन रुग्ण होमिओ उपचाराने पूर्ण रोगमुक्‍त झाले व त्यांचे पाय कापणे वाचले.
5) अनेक वेळा मुतखडा होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांचे मुतखडे उपचाराने पडले एवढेच नव्हे तर ती प्रवृत्ती नष्ट झाली.
6) भगंदर मूळ व्याधीचे शस्त्रक्रियेनंतर उद्‌भवल्या त्या होमिओपॅथीने उद्‌भवण्याच्या बंद झाल्या व आणखी शस्त्रक्रिया टळल्या. सीस्ट, गॅंगलीऑन व गर्भाशय गाठी कमी झाल्या. चामखिळी गळून पडली,
7) अनेकांचा सौंदर्य बिघाड घालवला.
8) अनेक मनोकायीक रोग बरे झालेत.
9) अनेक बालके स्त्रिया यांचे रोग बरे केलेत याचा गेल्या पंचवीस वर्षांत आलेल्या अनुभवावरून होमिओपॅथी उपयुक्‍त नाही, असा एकही रोग आहे. अशी खात्री झाली आहे. दुर्दैवाने होमिओपॅथीबद्दल काही गैरसमज आहेत तसेच होमिओपॅथी शास्त्र नाही म्हणणारेही आहेत. गैरसमाजात काही तथ्य नाही! शास्त्र नाही म्हणणे अज्ञानाचे ठरते याची उदाहरणे म्हणजे ज्यांनी होमिओपॅथी शास्त्रच नाही असे ठरवण्यासाठी तिचा अभ्यास केला व प्रत्यय घेतला ते टीकाकार होमिओपॅथीचे खंदे समर्थक बनलेत. सर्व उपचार करून थकल्यानंतर रोगी होमिओपॅथीकडे वळतात तेच जर सुरुवातीलाच होमिओपॅथीकडे रोगी आला तर त्याच्या रोगाचे प्रक्रियेचेच निर्मूलन होऊन रोग जन्मण्याआधीच नष्ट होऊ शकतो. प्राकृतिक उपचाराने रोग समूळ नष्ट होतो.

घरगुती उपचारही आधी करून पहाच…

भूक मंदावणे –
भूक मंदावणे याला अग्निमांद्य असेही म्हटले जाते. भूक मंदावण्यासाठी चुकीची जीवनशैली आणि शारीरिक अथवा मानसिक ताणही कारणीभूत असल्याचे आढळून येते. निसर्गचक्राच्या विरुद्ध जावून आपण काही करु पाहिले तर त्याचा अनिष्ट परिणाम हा भूकेवर होते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही घरगुती उपाय येथे देत आहोत…

भूकच लागत नसल्यास…
एक चमचा हिंगाष्टक चूर्ण जेवणापूर्वी घ्यावे.
आल्यावर लिंबू पिळून ठेवा. त्यावर काळे मीठ घाला. थोड्या वेळाने खावे. अपचन, बद्धकोष्ठ यामध्ये उपयोगी पडू शकते.
वेलची सालीसह कुटून पाण्यात टाकावे. ते उकळून प्यावे. उचकी थांबते.
पुदिना 20 पाने, प्रत्येकी दहा ग्रॅम बडीशेप, खडीसाखर काळी मिरी एकत्र वाटा. रस गाळून घ्या. उचकी सुरू झाल्यावर हे दोन थेंब एक ग्लास पाण्यात घालून प्या.

डोके दुखत असल्यास…
पवेखंड उगाळून डोक्‍याला लावावे.
पसुंठ व मिरी चूर्ण खावे.
पशुद्ध तुपाचे 2-4 थेंब नाकात सोडावे. अर्धशिशीचा त्रास कमी होतो.
पअर्ध-डोके दुखत असेल तर पांढरा कांदा किसून त्याचा लेप लावावा.
पपेढा किंवा गोड खाल्ल्‌यानेही कमी होते. विशेषतः पहाटे पेढा खावा.
पमाक्‍याच्या पानाच्या रसात काळी मिरी वाटून, तो लेप लावा.
पचंदन उगाळून, त्यात लसणाची पेस्ट घालावी. ते कपाळाला लावावे.
पमाक्‍याच्या पानाचा रस काढावा, त्यात काळी मिरी वाटून लेप द्यावा.
पचंदन व लसूण उगाळून ते एकत्रित करून त्याचा लेप कपाळावर लावावा.
पचार वेलची, सालीसहित कुटून पाण्यात मिसळून ते पाणी उकळावे, हे पाणी प्यायल्याने उचकी थांबते.
पपुदिन्याची 20 पाने, प्रत्येकी दहा ग्रॅंम बडीशेप, खडीसाखर आणि पकाळी मिरी घेऊ न एकत्र वाटा. त्याचा रस फडक्‍याने गाळून ध्या.

पउचकी लागल्यावर या रसाचे 2-3 थेंब पेलाभर पाण्यात टाकून प्याल्यास उचकी बरी होईल. एका बशीमध्ये आल्याचा कीस घेऊन त्यावर ताजे टवटवीत लिंबू पिळावे व त्यावर काळे मीठ (सैंधव) टाकावे आणि त्यावर वाटी पालथी घालावी. थोड्या वेळाने रस सुटेल, तो थोडा थोडा चाखावा आणि आले चावून खावे असे केल्याने अपचन, बद्धकोष्टता या सर्व तक्रारी दूर होऊन पोटाचे आरोग्य सुधारते. भूक लागत नसल्यास जेवणापूर्वी अर्धा तास अधी आल्याचा तुकडा सैंधव बरोबर खावा.

Leave a Comment