Horoscope | आजचे भविष्य ( शुक्रवार : १६ जुलै २०२१)

मेष : खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. सहवासात वेळ मजेत जाईल.

वृषभ : मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल. विनाकारण धावपळ, दगदग पात्र टाळा. रागावर नियंत्रण ठेवावे.

मिथुन : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. प्रकृतीमान सुधारेल. मानसिक समाधान मिळेल.

कर्क : बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण लवचिक ठेवा.

सिंह : सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. तरुणांना प्राविण्य दाखवता येईल.

कन्या : घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. महत्वाचे निणय घेताना महिलांना जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल.

तूळ : घरात महत्वाचे निर्णयात तुमचा पुढाकार राहील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल.

वृश्‍चिक : नोकरीत कामाचा ताण वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनोकामना पूर्ण होईल

धनू :विचारापेक्षा कृतीवर भर दया. घरात कुटुंब समवेत प्रवासाचे बेत सफल होतील. कामात पुढाकार घेतील.

मकर : तुमच्या कामातील गुणांची कदर सर्वजण करतील. महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल.

कुंभ : घरात बदल करू नयेत. नवीन वाहन, जागा, खरेदीचे मनसुबे ठरतील. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

मीन : घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल. मित्रमैत्रीणी समवेत वेळ मजेत जाईल.

घरात बदल करू नयेत. नवीन वाहन, जागा, खरेदीचे मनसुबे ठरतील. वातावरण आनंदी व उत्साही राहील.