Horoscope | आजचे भविष्य (शनिवार : 17 एप्रिल 2021)

मेष
कामामध्ये जरी अडचणी आल्या तरी त्यावर मात केल्याशिवाय यश मिळणार नाही. हातामध्ये मिळणाऱ्या पैशाचे गणित मागे पुढे झाल्यामुळे काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंदा व्यवसायात नियोजनबद्ध काम करा. प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. नोकरीमध्ये आपले काम पडताळून पाहून मगच ते वरिष्ठांपुढे ठेवावे भावनेच्या भरात तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नका. घरामध्ये स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य दयाल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ
नोकरी व व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पाऊले टाका. राग आला तरी प्रकट करु नका. शांत रहा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांनी तात्विक मुद्‌दयांवरुन होणारे इतरांशी वादविवाद टाळावेत. मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गोंधळ करु नये.

मिथुन
पैशाची सध्याची स्थिती उत्तम राहील. त्यामुळे तुमचा उत्साह व आनंद द्विगुणीत होईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. महिलांना घरात प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल. पाहुण्यांची ये-जा राहील. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. तरुणांनी अतिसाहस करु नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकुल ग्रहमान.

कर्क
बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. कामात बदल करुन नवीन विस्ताराचे बेत मनात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करुन कामे ओढवून घेऊ नका. पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर रहा. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. अनपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांनी मोठया व्यक्‍तींचा सल्ला घ्यावा.

सिंह माणसांची पारख करणे जिकिरीचे होईल. खरे व खोटे यातील फरक ओळखा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रत्येक पाऊल विचाराने टाकावे. निष्णात व्यक्तिंचा सल्ला घ्यावा. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. नवीन ओळखी होतील. महिलांनी कामाचा उरक पाडावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी स्वतःचे कामाचे कौशल्य वाढवावे. विद्यार्थ्यांनी यशदायक ग्रहमान.

कन्या
कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करुन कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकीकरण कराल. नोकरीत कामात बिनचूक राहून वरिष्ठांना चूकांवर बोटे ठेवण्याची संधी देऊ नका. मनाविरुद्ध वागावे लागेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. तुमचे व तुमच्या कामाचे कौतुक घरातील व्यक्तिंकडून होईल. पूर्वी दुर्लक्षित केलेल्या गोष्टींकडे लक्ष दयावे लागेल. विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतील.

तूळ
वातावरणानुसार लवचिक धोरण ठेवलेत तर फायदा होईल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत तत्वाला मूरड घालून तडजोड करावी लागेल. नको त्या कामात बराच वेळ व पैसे खर्च होतील. कौटुंबिक स्वास्थ्याचा अनुभव घ्याल. महिलांच्या मनाप्रमाणे कामे होतील. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणे आवश्‍यक. कदाचित परिक्षा अचानकपणे जाहीर होईल.

वृश्‍चिक
ग्रहमान अनुकूल असल्याने सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील. पूर्वी केलेल्या कामाचे यश आर्थिक स्वरुपात मिळेल. व्यवसायात नवीन घडामोडी घडतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामात सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नका. कामानिमित्ताने प्रवास कराल. घरात लांबचे नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. सुवार्ता कळेल. कलाकार, खेळाडूंना, राजकारणी व्यक्तिंना मागणी राहील. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

धनू
नोकरी व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. कुणावरही अवलंबून राहू नका. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी सखोलतेने विचार करा. पैशाची तंगी थोडी जाणवेल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील रहाल. बेकारांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. महिलांनी ऐकीव बातमीवर विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. भागीदाराचे विचार न पटल्याने वादविवाद होतील. तरुणांनी अविचाराने वागू नये. विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून अभ्यासाला लागावे.

मकर
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तरतूद केलेली लाभदायक ठरेल. व्यवसायात अडथळयांवर मात करून यश मिळवाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. जोडधंदा फायदा मिळवून देईल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. तुमचे महत्व वाढेल. सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. घरात आपल्याच माणसांकडून नवीन अनुभव घ्याल. विद्‌यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

कुंभ
ग्रह तुमच्या दिमतीला असतील त्याचा लाभ घ्या. पैशाची फारशी फिकीर नसल्याने खर्चावर बंधन राहणार नाही. व्यवसायात नवीन विचार व कार्यपद्‌धतीचा अवलंब करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याची मुभा वरिष्ठ देतील. वेगळया पद्‌धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात कुटुंबासह फेरफटका मारण्याचा व छोटी सहल काढण्याचा कार्यक्रम ठरेल. महिलांना कुटुंबासह प्रवासाचे योग येतील नवविवाहितांना छोटयाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मीन
परिस्थितीनुसार ध्येय धोरणात बदल केल्यास लाभ होईल. व्यवसायात पैशाची चणचण जाणवली तरी तात्पुरती पैशाची सोय होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. मनोबल उंचावेल. प्रकृतीची साथ मिळेल. कलावंत खेळाडूंना क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. महिलांनी अतिदगदग करु नये. घरात वातावरण आनंदी राहील.

Leave a Comment