पुणे जिल्हा | तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझी

शिरूर – रस्ते, पिण्याच्या पाण्याविषयीचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. मला तुम्ही पाठबळ देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चिंत रहा, अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर विधानसभा मतदार संघातील अण्णापूर, रामलिंग, कर्डेलवाडी येथील प्रचारदौर्‍याला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या दौर्‍याचा शुभारंभ अण्णापूर येथून झाला. त्यावेळी आढळऱाव पाटील यांचे ग्रामस्थांकडून वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

आढळराव यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या कोपरा सभेत त्यांनी तुमच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, आणि केंद्रात मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आमच्या पाठीशी तुम्ही ग्रामस्थांनी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती शशिकांत दसगुडे, मोनिका हरगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, भाजप नेत्या जयश्री पलांडे, राजेंद्र जगदाळे, अरुण गिरे, राहुल पाचारणे, रवी बापू काळे, आबासाहेब सरोदे, दादा पाटील गावडे, आदींसह विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी यावेळी उपस्थिती होती.

रामलिंग येथे भेट दिल्यानंतर ग्रामदैवताचे आढळराव यांनी दर्शन घेतले. शोभाताई रसिकलाल धारीवाल सभा मंडपात सभा झाली. ग्रामस्थांशी संवाद साधताना. गावाचे प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावणार आहे, असे आश्वासन यावेळी आढळऱाव यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष आरती भुजबळ, विकास सोसायटी चेअरमन आप्पासाहेब वर्पे, भाजप युवक मोर्चाचे एकनाथ शेलार,

शहराध्यक्ष तुषार भदाणे, उपाध्यक्ष रिटा जाधव, सरपंच बाबाजी वरपे, माजी सरपंच विठ्ठल धावटे, संजय शिंदे, भरत बोर्हाडे, माजी उपसरपंच अभिलाष धावटे, यशवंत कर्डिले, अनिल लोंढे, अनिल धावटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बोराडे, विजय धावटे, गणेश धायगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष अमित बोराडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय दसगुडे, हिरामण जाधव, सागर धावटे आदि उपस्थित होते.

दरम्यान, कर्डेलवाडी येथेही आढळराव यांचे उत्स्फूर्त स्वागत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. सरपंच संतोष कर्डिले, लता कर्डिले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कर्डिले, युवा सेना तालुका अध्यक्ष मारुती आप्पा करमाळे, उपसरपंच सोन्याबापु दसगुडे, राहुल दसगुडे, मेजर अर्जुनराव दसगुडे, गाडामालक बाळासाहेब नवले व कार्यकर्ते उपस्थित होते, कर्डेलवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण कर्डीले यांनी मनोगत व्यक्त केले.