मी कन्हैया कुमारचा समर्थक – दिग्विजय सिंह

भोपाळ – काँग्रेस पक्षाचे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी मी कन्हैया कुमारचा समर्थक असल्याचे म्हंटले आहे.  बिहार मध्ये कन्हैया कुमारला पाठिंबा न देऊन राष्ट्रीय जनता दल या पक्षाने मोठी चूक केली असल्याचे दिग्विजय सिंह यांनी आज सांगितले. तसेच येत्या ८ आणि ९ तारखेला कन्हैया कुमार प्रचारासाठी भोपाळ मध्ये येणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथील जवाहरला नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढणार आहे.

Leave a Comment