‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे.

Omisure चाचणी किट इतर RT-PCR चाचणी किट प्रमाणेच कार्य करेल. या किटच्या सहाय्याने चाचणीसाठी नाक किंवा तोंडातून स्वॅब देखील घेतला जाईल. त्यानंतर चाचणीचा अंतिम अहवाल इतर RT-PCR चाचण्यांप्रमाणेच फक्त 10 ते 15 मिनिटांत येईल. Omisure ची चाचणी करण्याची पद्धत इतर RT-PCR चाचण्यांपेक्षा वेगळी असणार नाही. ICMRने या किटला मान्यता देत हा मोठा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी अमेरिकन टेस्ट किटद्वारे ओमायक्रॉनची केली जात होती तपासणी
यापूर्वी, अमेरिकन कंपनी थर्मो फिशरचे मल्टिप्लेक्स किट देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी वापरले जात होते, जे थोडे महाग होते. त्याची किंमत 240 रुपये आहे.