T20 World Cup 2024 : जर भारताविरूध्द पाकिस्तान हरला तर टी-20 विश्वचषकातून बाहेर..! जाणून घ्या, बाबरच्या संघाचे सुपर-8 मध्ये जाण्याचे समीकरण…

T20 World Cup 2024 (Pakistan Super-8 Qualification Scenario) : पाकिस्तानचा 9 जून रोजी सामना भारताशी होणार आहे, जो 2024 च्या टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना असेल. पहिल्याच चकमकीत पाकिस्तान संघाला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारताला पराभूत करू शकला नाही, तर सुपर-8मध्ये जाण्याच्या त्याच्या आशांना मोठा फटका बसू शकतो. कारण, भारताने आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. दुसरीकडे, यूएसए 100 टक्के विजयासह गट अ मध्ये अव्वल स्थानावर आहे.

सध्या, यजमान यूएसए +0.626 च्या निव्वळ रन-रेटसह 2 सामन्यांतून 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा निव्वळ धावगती +0.3065 आहे. कॅनडा 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान आणि आयर्लंड यांना अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही, जे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

पाकिस्तान सुपर-8 मध्ये जाऊ शकतो का?

पाकिस्तान संघाने अ गटातील आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तरी त्यांना सुपर-8 टप्प्यातून बाहेर पडावे लागू शकते. भारत, पाकिस्तान आणि अमेरिका यांचे 6 गुण असू शकतात. अशा परिस्थितीत नेट रन-रेटच्या आधारे 2 संघ सुपर-8 मध्ये जातील. भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत पाकिस्तानचा निव्वळ रन-रेट खूपच खराब असल्याने, सध्या सुपर-8 मध्ये जाणे जवळजवळ अशक्य आहे.

T20 World Cup 2024 : भारत-पाक रणसंग्राम आज..! हायहोल्टेज सामन्याकडे जगाच्या नजरा; जाणून घ्या, सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

पाकिस्तान सुपर-8 मध्ये कसा पोहोचेल?

जर पाकिस्तानला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी आपल्या आशा जिवंत ठेवायाच्या असतील तर पुढील दोन्ही सामने यूएसए हरेल अशी आशा त्यांना करावी लागेल. केवळ अमेरिकाच नाही तर पाकिस्तान संघाला इतर सामन्यांचे निकालही आपल्या बाजूने जातील अशी आशा बाळगावी लागेल. बरं, हा सगळा जर-तरचा खेळ आहे, पण सत्य हे आहे की पाकिस्तानला सुपर-8 मध्ये जाणं अवघड नसलं तरी सध्यातरी ते अशक्य वाटतंय.