भाऊ असावा तर असा! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून धाकट्या भावाने हेलिकॉप्टरने गावाला घातली प्रदक्षिणा

Sangli: सांगलीतील दोन भावांची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. अंकुश यांचे बंधू साहेबराव खिलारे हे गावाचे उपसरपंच झाले. त्यानंतर अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली. कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून छोट्या भावाने गावाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला. यामुळे सांगलीतील आटपाडीमधल्या खिलारे बंधूंची सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अंकुश खिलारे असं हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचं नाव आहे. तर साहेबराव खिलारे असं उपसरपंच झालेल्या भावाचं नाव आहे. आपला मोठा भाऊ साहेबराव खिलारे याने गावतल्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभं राहावे आणि त्याच्या कामाचा सर्वत्र चर्चा व्हावी,  अशी अंकुश खिलारे यांची इच्छा होती. त्यानंतर साहेबराव खिलारे हे करगणी गावचे उपसरपंच झाले. मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून लहान भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील खिलारे बंधूंप्रेमाची परिसरात प्रचंड चर्चा होत आहे.

आपला भाऊ गावच्या उपसरपंच पदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झालं.  स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टर मधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण केली. गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातल्या.

गावाला हेलिकॉप्टरने घातली प्रदक्षिणा

अंकुश हे गलाई व्यावसायिक असून व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी आपले ज्येष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर या धाकट्या भावाने मोठ्या थाटामाटात भावाचे स्वागत केलं. यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते.