nagar | पोखरीत अवैध वाळू वाहतूक

नगर, (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील पोखरी येथे अवैध वाळू वाहतूक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा गिताराम सोनवणे (वय ३१, रा. वासूंदे, ता. पारनेर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी करुन वाहतुक केल्याने त्याच्याकडील 10 लाख रुपये रुपये किंमतीचा १ ढंपर व 30 हजार रुपये किंमतीची ३ ब्रास वाळु असा एकुण 10 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पारनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार् पारनेर तालुक्यातील पोखरी येथे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहितीमिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने पोखरी येथे सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रणजीत जाधव व शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने केली.