ड्राय डे संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; ४ जूनला वाईन शॉप उघडणार का?

Mumbai High Court | Dry Day – लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मुंबईत पूर्ण दिवसभर ड्राय डे अर्थात मद्य विक्री बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात न्यायालयातही धाव घेण्यात आली होती.

४ जूनला मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत देशात काय स्थिती राहील आणि पुन्हा कोणाचे सरकार येणार आहे याचे चित्र स्पष्ट झालेले असेल. त्यामुळे निकाल लागल्यानंतर दुपारनंतर बार उघडण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी बार मालकांकडून याचिकेत करण्यात आली होती.

त्यावर झालेल्या सुनावणीनंतर आपल्या आदेशात न्या. एन. आर. बोरकर आणि न्या. सोमशेखर सुंदरसन यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णय स्थगिती दिली. त्यामुळे दुपारनंतर सगळे व्यवहार सुरू केले जाणार आहेत.

दरम्यान, वाइन शॉपही दुपारी चार नंतर सुरू केले जाणार असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र त्याबाबत कोणती माहिती देण्यात आली नाही.