Motorcycle Mileage : आता बाईकचं मायलेज वाढणार; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स…

Improve Motorcycle Mileage : मोटारसायकल खरेदी करताना लोकांना चांगली मायलेज देणारी बाईक घ्यायची असते. पण कोणतीही बाईक योग्य प्रकारे वापरल्यास ती आणखी चांगले मायलेज देऊ शकते. तुम्ही तुमच्या बाईकची राइडिंग स्टाइल बदलून तुमच्या वाहनाचे मायलेज वाढवू शकता.

बाईकचे मायलेज सुधारल्याने इंधनाची बचत होते, ज्यामुळे तुमची इंधन टाकी जास्त काळ टिकते. तुम्ही तुमच्या मोटरसायकल चालवण्याच्या पद्धतीत काही बदल केल्यास इंधनाची बचतही होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला बाईकचे मायलेज वाढवण्याचे काही सोपे मार्ग आहेत ते सांगणार आहोत…..

दुचाकीची हवा तपासून घ्या
सर्व बाईक PSI टायरने बसवलेल्या दिसतात. बाईकच्या टायरचा प्रेशर राखणे खूप गरजेचे आहे. टायरच्या हवेची माहिती कोणत्याही बाहेरच्या विक्रेत्याकडून न घेता बाइक उत्पादक कंपनीकडूनच मिळवावी. बाइकच्या टायरमधील हवा आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी नसावी. टायरमध्ये कमी हवा असताना बाईक रस्त्यावर ओढते, त्यामुळे बाइक चालवण्यासाठी जास्त इंधन लागते.

बाईक सांभाळा / देखभाल करा
बाईक खरेदी करण्यासोबतच ती नवीन तितकीच चांगली ठेवण्यासाठी आणि उत्तम परफॉर्मन्स मिळवण्यासाठी तिची नीट देखभाल करणेही महत्त्वाचे आहे. यासाठी बाईकचे तेल वेळोवेळी बदलत राहा, तेल आणि एअर फिल्टर तपासत राहा आणि आवश्यक असल्यास ते बदलून घ्या. बाईकची नियमित देखभाल केल्यास तुमच्या वाहनाचे इंजिन चांगले काम करेल.

बाईकमधून अतिरिक्त वस्तू काढा
मोटारसायकल कारपेक्षा खूपच लहान असते. बाईकवर जास्त सामान लोड केल्याने इंधनाचा वापरही वाढतो. जर तुमच्या मोटारसायकलवर अनावश्यक वस्तू बसवल्या असतील तर त्या वाहनातून काढून टाका. यामुळे तुमच्या बाइकचे मायलेज सुधारेल.

बाईकचा वेग कसा असावा
तुम्ही तुमच्या बाईकचा वेग कधी कमी केला तर कधी अचानक वाढवला तर त्यात जास्त इंधन लागते. दुचाकी जास्त वेगाने चालवली तरी जास्त इंधन वापरले जाते. जर तुम्ही मोटारसायकल सतत वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला तर तुमची इंधनाची बचत होईल आणि इंधनाची बचत होऊन तुमचे पैसेही वाचतील.