बारामतीत 83 वर्षीय आजीची करोनावर यशस्वी मात

बारामती (प्रतिनिधी) – नटराज संचलित तारांगण कोविड केअर सेंटर येथे 83 वर्षीय आज्जी विमल नामदेव सुतार यांनी करोनावर मात केली आहे. या आजींना कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगताच जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आजीची विशेष काळजी घेत करोनामुक्त करण्याची जबाबदारी घेतली. 

नटराज संचलित तारांगण कोविड केअर सेंटर येथे त्यांचेवर डाॅ सदानंद काळे व डाॅ. नम्रता शिंगाडे यांनी उपचार केले. करोनाकाळात राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी आजीची संपूर्ण काळजी घेतली. 

नटराज मेंबर मल्लिकार्जुन हिरेमठ, विनय आगवणे, गौरव जाधव सर्व नर्स स्टाफ यांनी आजीची सेवा केली. सध्या आजींचा संभाळ वैभव शहा करत आहेत आजींना डिस्चार्ज नंतर त्यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.