‘जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा….; स्वप्नील खाडे यांचा इशारा

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यामध्ये सन २०२३ मध्ये पूर्ण पाऊसकाळ हा कोरडा गेलेला असून थोडाफार प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यातच लघुपाटबंधारे व विविध स्वरूपाचे तलाव, नद्या, नाले यात कसल्याही प्रकारची पाणी पातळी साचलेली नाही.

त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून चारा चावण्यासह पाण्याचे टँकर चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी तहसीलदार गणेश माळी यांना निवेदनाव्दारे दिली आहे.

जामखेड तालुका पूर्णतः दुष्काळ जाहिर करण्यात यावा व दुष्काळातील योजना व विमा अंमल करण्यात यावा. तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाणी टँकर चालू करण्याते यावे. पशुधन टिकविण्यासाठी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील माफ करण्यात यावेत. गतवर्षी केलेल्या पिकविमा व अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावेत तसेच ५५ वयवर्षे वरील शेतकऱ्यांना १०,०००/- रू. पेंशन सुरू करण्यात यावेत.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावेत व दुधाला किमान आधारभूत किंमत वर्तमान स्थितीप्रमाणे मिळावे म्हणजे हमीभाव देण्यात यावा मुलां-मुलींसाठी शैक्षणिक शुल्क व परीक्षा फी माफ करण्यात यावी.

तसेच एस.टी. पासेस मोफत द्यावेत तरी वरील मागण्या शासन दरबारी मंजूर करून प्रशासनाने सहकार्य करावे. अन्यथा जामखेड शेतकऱ्यांच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्नील खाडे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.