पुण्यात डेंग्यूचे 50 टक्‍के रुग्ण चार प्रभागांतच ; उर्वरित रुग्ण 11 प्रभागांत

पुणे – शहरात 1 जानेवारी ते 27 ऑगस्ट या कालावधीत डेंग्यूच्या 254 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील 16 प्रभागांपैकी केवळ 4 प्रभागांमध्ये डेंग्यूच्या जवळपास निम्म्या रुग्णांचे म्हणजे 127 जणांचे निदान झाले आहे. प्रभागातील लोकसंख्या, पाणी साचण्याची ठिकाणे यांचा अभ्यास करुन महापालिकेने या प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने नियोजनास सुरूवात केली आहे.

हडपसर-मुंढवा, नगर रोड- वडगावशेरी, औंध-बाणेर आणि टिळकरोड-सिंहगडरोड या प्रभागांमध्ये डेंग्यूच्या 254 रुग्णांपैकी 127 रुग्ण आढळून आले आहेत. हडपसर-मुंढवा येथे सर्वाधिक (34), त्यानंतर नगर रस्ता- वडगावशेरी (33), औंध-बाणेर (32) आणि टिळक रोड-सिंहगड रोड (28) आहेत. सर्वात कमी रुग्ण ढोले पाटील रस्ता, वानवडी-रामटेकडी आणि भवानी पेठ प्रभागात प्रत्येकी 8, तर केशवनगर (4) आणि कोंढवा-येवलेवाडी (2) येथे नोंदवली गेली आहेत.

जास्त रुग्ण आढळलेले प्रभाग शहरातील सर्वात मोठे भागांपैकी आहेत. एक आहेत आणि या भागात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणे आणि कचराकुंड्यांमुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. जानेवारी 2022 ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत शहरात डेंग्यूचे 2 हजार 153 संशयित रुग्ण आढळले आहेत. पाऊस ओसरताच रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. नागरिकांनी त्यांच्या शेजारी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवावे आणि घरातही पाणी साठू देऊ नये.
डॉ. संजीव वावरे, साथरोग विभागप्रमुख आणि सहायक आरोग्य अधिकारी, मनपा