पुण्यात जड वाहनांमुळे नियोजन विस्कळीत ! म्हात्रे पूल ते नळ स्टॉप मार्गाचीही कोंडी

 

सहकारनगर, दि. 20 – म्हात्रे पूल ते नळ स्टॉप चौक मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन आणि पर्यायाने पैशांचा अपव्यय होत आहे. शिवाय, मनस्ताप होत आहे, तो वेगळाच. या परिस्थितीला जडवाहने कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या मार्गावर काही हॉस्पिटल्स आहेत. पण, अनेकदा रुग्णवाहिकेलाही कोंडीचा सामना करावा लागतो. शाळा व मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे शाळेत जाण्यास उशीर होतो. येथील रस्त्यावर जड वाहने दिवसा आणि गर्दीच्या वेळेत बंद करावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. याच मार्गावरून अनेक एसटी बसेस धावतात. त्यामुळेही सामान्य वाहनचालक कोंडीत अडकत आहेत. या समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते अभिजित रामदास बारवकर यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर पोलीस यांना विनंती अर्जही केला आहे.