Punjab Police : दोन महिन्यांत 4 हजार 223 अंमली पदार्थ तस्कर जाळ्यात

चंडिगढ – पंजाबमध्ये पोलिसांनी जुलैपासून व्यापक अंमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेत 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 4 हजार 223 तस्करांना अटक करण्यात आली.

पंजाबमधील मोहिमेदरम्यान हेरॉईन या अंमली पदार्थाचा एकूण 175 किलो साठा हस्तगत करण्यात आला. त्याशिवाय, तस्करांकडील मिळून 2.73 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. पंजाब पोलिसांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील बंदरांवरूनही 147 किलो हेरॉईन जप्त केले. त्यामुळे पंजाब पोलिसांनी 2 महिन्यांत एकूण 322 किलो हेरॉईन पकडले.

पंजाबमधील अंमली पदार्थांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पंजाब पोलीस सरसावले आहेत.