सातारा | शिवकालीन मर्दानी खेळ स्पर्धेत

दहिवडी, (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा, अष्टे डू मर्दानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टे डु स्पर्धा 2023 -24 अष्टे डू मर्दानी आखाडा स्पर्धा तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेई क्रीडा संकुल तुमसर येथे पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, वासिम, भंडारा, पुणे, बीड, औरंगाबाद सह या स्पर्धेसाठी 200 ते 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी येथील ए वन कराटे क्लबच्या समृद्धी मोरे या विद्यार्थ्यांनी आपला जलवा दाखवत गोल्ड मेडलची कमाई केली.
समृद्धी मोरे हिचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थिनीला प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू नवनाथ भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अष्टेडू आखाडा असोसिएशनचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी पवार, अष्टे डू चे जिल्हा सातारा उपाध्यक्ष बंडोपंत लोखंडे, खजिनदार नवनाथ भिसे, रोहित लिलेंगे, श्रेयश लंगडे यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.