आयकर विभागाने करदात्यांना दिली शेवटची संधी ; ‘या’ तारखेपर्यंत आयटीआर भरण्याच्या सूचना

Income Tax Department । आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती समोर आलीय. प्राप्तिकर विभागाने अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च निश्चित केलीय. ज्यांनी त्यांच्या रिटर्नमधील माहितीमध्ये घोळ केलाय. किंवा ज्यांनी आयटीआर भरलाच नाही. अशा लोकांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी विभागाने शेवटची संधी दिली आहे.

व्याज आणि लाभांश उत्पन्नाची चुकीची माहिती  Income Tax Department ।
प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्नमध्ये तृतीय पक्षांकडून मिळालेले व्याज आणि लाभांश उत्पन्नाची योग्य माहिती दिलेली नाही. अनेक करदात्यांनी रिटर्न भरलेले नाहीत. आयकर विभागाने या लोकांची ओळख पटवली आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत चुका सुधारण्याची संधीही देण्यात आलीय. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन अपडेटेड रिटर्न भरावे लागेल. ही माहिती विभागाकडून करदात्यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जातीय.

आयटीआरमध्ये मोठे व्यवहार उघड केले जात नाहीत
आयकर विभागाला अशा आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली आहे. हे वार्षिक माहिती विधान (AIS) द्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. करदाते हे सहज पाहू शकतात. लोकांनी स्वेच्छेने कर भरावा आणि पारदर्शकता राखावी यासाठी आयकर विभाग प्रयत्न करत आहे. 2021-22 (आर्थिक वर्ष 2020-21) मूल्यांकन वर्षात भरलेल्या काही आयकर विवरणांमध्ये ही विसंगती आढळून आलीय. आयटीआरमध्ये दिलेली माहिती आणि आयटी विभागाकडे उपलब्ध आर्थिक व्यवहार यामध्ये तफावत असल्याचे विभागाला समोर आले आहे. त्यामुळे लोकांना अद्ययावत रिटर्न भरण्याची संधी देण्यात आलीय.

आयटीआर दाखल न करणाऱ्यांविरुद्ध चौकशी Income Tax Department ।
याशिवाय मोठे आर्थिक व्यवहार करूनही आयटीआर दाखल न करणाऱ्यांविरोधातही तपास सुरू आहे. ई-व्हेरिफिकेशन स्कीम-2021 अंतर्गत विभाग या लोकांना ईमेलद्वारे माहिती पाठवत आहे. याद्वारे विभाग करदात्यांना https://eportal.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलद्वारे त्यांचे AIS तपासण्याची विनंती करत आहे. आवश्यक असल्यास ITR-U देखील दाखल करा. जर करदात्यांनी ई-फायलिंग वेबसाइटवर नोंदणी केली नसेल तर त्यांना नोंदणी करावी लागेल. जर करदात्यांना विसंगती दुरुस्त करता येत नसेल, तरीही ते अद्ययावत आयकर रिटर्नद्वारे योग्यरित्या उत्पन्नाचा अहवाल देऊ शकतात.