नव्या वर्षापासून दाढी कटींगच्या दरात वाढ

पुणे – दाढी कटींगच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय पुणे शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. केस कटींगच्या दरात 20 रुपये तर दाढीच्या दरात 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. येत्या 1 जानेवारीपासूनही दरवाढ लागू होणार आहे. संघटनेच्या पुणे शहर अध्यक्ष महेश सांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

सध्या पुणे शहरात कटींगसाठी व विविध भागांमध्ये वेगवेगळे दर आकारले जातात. काही ठिकाणी 80 रुपये तर काही ठिकाणी 100 रुपये दर आकारला जात आहेत. नववर्षात दरात 20 रुपयांची भर पडणार आहे. तर दाढीसाठी आकारल्या जाणाऱ्या 50 रुपयांमध्ये 10 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दाढी करण्यासाठी पुण्यातील ग्राहकांना आता 60 रुपये मोजावे लागणार आहेत. शहरातील सर्व नाभिक संघटनांची संयुक्‍त बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment